नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 04:58 PM2020-02-17T16:58:04+5:302020-02-17T16:59:05+5:30
मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून एका युवकाची दोन लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलदीप तुकाराम काळे (रा. खारगर, मुंबई) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून एका युवकाची दोन लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलदीप तुकाराम काळे (रा. खारगर, मुंबई) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळासाहेब गेणू साळूंखे (रा. करंजे सातारा. मूळ रा. अंबवडे, ता. कोरेगाव) यांचा मुलगा दीपक याला मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून कुलदीप काळे याने दोन लाख रुपये घेतले.
१ डिसेंबर २०१५ रोजी प्रतापगंज पेठेतील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेतून कुलदीप काळे याच्या मुंबई येथील खात्यात ते पैसे जमा केले. मात्र पैसे पाठवूनही आपल्या मुलाला नोकरी लागत नसल्याचे लक्षात येताच बाळासाहेब साळुंखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.