साता-यात गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 07:39 PM2019-09-21T19:39:36+5:302019-09-21T19:42:20+5:30
मुख्य सूत्रधार अमित उर्फ कोयत्या राजेंद्र पवार (वय १९, रा. बारामती), भानुदास उर्फ काका लक्ष्मण धोत्रे (वय ३९, रा. क-हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंटजवळ संशयितरित्या फिरणा-या एका युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
मुख्य सूत्रधार अमित उर्फ कोयत्या राजेंद्र पवार (वय १९, रा. बारामती), भानुदास उर्फ काका लक्ष्मण धोत्रे (वय ३९, रा. क-हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला तेथे तत्काळ पाठविले. अमित पवार याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने माझ्याजवळ असलेले पिस्टल क-हाड येथे राहणा-या भानुदास धोत्रे याला द्यायचे आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून धोत्रे यालाही कºहाडमधून अटक केली.
दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, अमित पवार याच्यावर बारामती येथे खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे तर धोत्रेवर कºहाड पोलीस ठाण्यात मारामारीचे विविध गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, शरद बेबले, योगेश पोळ, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख आदींनी भाग घेतला.