साताºयात दोन तास थरार राजपथावर दोन मस्तवाल वळूंची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:12 AM2018-01-10T00:12:16+5:302018-01-10T00:16:03+5:30

सातारा : राजपथावर सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांची शाळेत अन् नोकरदारांची कामावर जाण्याची लगबग सुरू होती. दुकानदारही दुकाने उघडू पाहत होते.

Two mast bull battles on the Tharar Rajpath, for two hours in Satha | साताºयात दोन तास थरार राजपथावर दोन मस्तवाल वळूंची झुंज

साताºयात दोन तास थरार राजपथावर दोन मस्तवाल वळूंची झुंज

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनांची मोडतोड अन् वाहतुकीची कोंडी; वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरणझुंज थांबल्यानंतही शहरात मात्र,या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.

सातारा : राजपथावर सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांची शाळेत अन् नोकरदारांची कामावर जाण्याची लगबग सुरू होती. दुकानदारही दुकाने उघडू पाहत होते. वाहनांची गर्दी हळूहळू वाढत असतानाच भर रस्त्यात दोन वळूंची झुंज सुरू झाली. अचानक घडलेल्या या प्रकाराने राजपथावर सर्वांचीच पळापळ सुरू झाली. हा थरार पाहण्यासाठी बघ्याची गर्दीही झाली. अनेकांनी भितीपोटी सुरक्षित ठिकाण गाठले. अखेर मस्तवाल वळूंची झुंज मिटविण्यात सातारकरांना पुढाकार घ्यावा लागला. तब्बल दोन तासांनतर ही झुंज थांबली.

राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाºयांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी सकाळी साडेनऊच्या सुमारास या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत होते. अधूनमधून ते रस्त्यावर येत असल्याने वाहतूकही विस्कळीत होत होती.

काही वेळेत ते शांत होतील, असे वाटत असतानाच अर्धा-पाऊण तास झाला तरी ते थांबण्याचे नाव घेत नव्हते. काही तरुण काठीच्या साह्याने झुंज सोडविण्याचा प्रयत्न करत होते; पण प्रयत्न निष्फळ ठरले. त्यातील एक वळू फूटपाथवरून सात फूट खोल बेसमेंटमध्ये पडला. त्यामुळे एका वळूने रस्त्याकडेच्या गाड्या पाडल्या. दरम्यानच्या काळात खाली पडलेला वळूही पायºयांवरून वर आला अन् पुन्हा त्यांच्यामध्ये झुंज लागली. जमलेल्या शेकडो जमावाने शिट्ट्या वाजविल्या, आरडाओरड केल्यानंतर ते दोन्ही वळू घाबरून पळून गेले अन् त्यानंतर ही झुंज मिटली.

राजपथावर सकाळी घटलेल्या या प्रकाराने नागरिक भलतेचचक्रावून गेले. अनेकांनी हा थरार आपल्या कॅमेरॅत कैद केला. ही
झुंज थांबल्यानंतही शहरात मात्र,या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.


तरुणांमधील फोटोग्राफर जागा
वळूंच्या झुंजीमुळे राजपथ दोन तास वेठीस धरला होता. जीव मुठीत धरून वाहनचालक पुढे जात होते. शेकडो सातारकर दुकानांच्या कठड्यावर चढून सुरक्षितपणे झुंज पाहत होते. तर बोटावर मोजण्याऐवढेच तरुण झुंज सोडविण्याचा प्रयत्न करत होते; पण त्यातूनही काही तरुणांमधील फोटोग्राफर जागा झाला. जीव धोक्यात घालून हा थरार मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी चित्रीकरण तर काहीजण फोटो काढत होते.


सायकलस्वारांची पळापळ
राजपथावरून सकाळच्या वेळी अनेक सातारकर चालत फिरायला जातात. तर काहीजण सायकलवरून रपेट मारतात. त्याचवेळी झुंज लागल्याने दुचाकीस्वारांनी रस्त्यावर गाड्या लावून पळून गेले. तर सायकलस्वार सायकल खांद्यावर घेऊन पळून गेले.

पोलिसही हतबल
झुंज सुरू असल्याने मोठी वाहने रस्त्यावर थांबली होती. त्यामुळे वाहनांची कोंडी झाली होती. त्यातच शाळा-महाविद्यालयांची वेळ असल्याने वाहनचालक ‘हॉर्न’ वाजवत होते. त्यामुळे वाहतूक पोलिस दाखल झाले; पण तेही हतबल झाले.

Web Title: Two mast bull battles on the Tharar Rajpath, for two hours in Satha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.