जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:04+5:302021-01-25T04:39:04+5:30
सातारा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, बळींचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
सातारा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, बळींचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८११ वर पोहोचली आहे, तसेच नवे ६६ रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा ५६ हजार १२ इतका झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. शुक्रवारी रात्री ६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील करंजे पेठेतील ६५ वर्षीय पुरुष, तसेच जकातवाडी, (ता. सातारा) येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी ९८ जण, तर आतापर्यंत ५३ हजार ४५८ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तसेच दिवसभरात तब्बल १ हजार ३६६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे.