जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:16+5:302021-03-14T04:35:16+5:30
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गत चोवीस तासात ११५ रुग्ण आढळून आले. यामध्ये दोघांचा ...
सातारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गत चोवीस तासात ११५ रुग्ण आढळून आले. यामध्ये दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या १ हजार ९७१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा कहर सुरू केला असून, सर्वच तालुके कोरोनाने व्यापले आहेत. रोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी चोवीस तासांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जावळी तालुक्यातील बामणोली येथील ६५ वर्षीय पुरुष, कुडाळमधील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना मुक्तीचेही प्रमाण वाढले असून, शुक्रवारी दिवसभरात २५१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ५७ हजार ६६ जण काेरोनामुक्त झाले आहेत, तर ६० हजार ५८१ वर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे.
सातारा आणि कऱ्हाड हे दोन तालुके कोरोनाचे पुन्हा हाॅट स्पाॅट ठरत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी मास्क घालून घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.