कऱ्हाडमध्ये फाॅगिंगसाठी आणखी दोन आधुनिक मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:43 AM2021-08-19T04:43:06+5:302021-08-19T04:43:06+5:30
कऱ्हाड: ‘फाईट द बाईट’ अभियानांतर्गत कऱ्हाड शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने आणखी दोन अत्याधुनिक फॉगिंग मशीन खरेदी केली आहेत. ...
कऱ्हाड: ‘फाईट द बाईट’ अभियानांतर्गत कऱ्हाड शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने आणखी दोन अत्याधुनिक फॉगिंग मशीन खरेदी केली आहेत. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत या मशीननची चाचणी घेण्यात आली. अगोदरच्या मशीनपेक्षा नवीन मशीन प्रभावी असल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले.
शहरात पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिका सतर्क आहे. विविध भागात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे. आशा वर्कर आणि मुकादम यांच्या वतीने सर्व्हे करण्यात येत आहे. पालिकेकडे धूर फवारणीसाठी चार मशीन होती. त्याचा वापर करण्यात येत होता. मात्र लिओ कंपनीची आधुनिक पद्धतीची दोन मशीन पालिकेने खरेदी केली आहेत. या मशीनमध्ये पाण्याची टाकी समाविष्ट असून धुराबरोबरच बाष्प निर्मिती होते. त्यामुळे धूर जमिनीबरोबर जास्त वेळ राहतो. त्यामुळे डासांचे निर्मूलन करण्यासाठी नवीन मशीन अधिक प्रभावीपणे काम करत आहे.
नवीन मशीनची चाचणी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नवीन मशीनची किंमत प्रत्येकी ३२ हजार रुपये असून एकूण सहा मशीन पालिकेकडे झाली आहेत.
फोटो
कराड पालिकेने खरेदी केलेले नवीन फाॅगिंग मशीन