सातारा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 05:43 PM2021-03-15T17:43:22+5:302021-03-15T17:44:04+5:30

CoronaVirus Satara- सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत जिल्ह्यात १५७ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८३७ वर पोहोचली आहे.

Two more victims of corona in Satara district | सातारा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी

Next
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळीचोवीस तासांमध्ये सातारा जिल्ह्यात १५४ जण कोरोनाबाधित

सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत जिल्ह्यात १५७ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८३७ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात एकीकडे लस देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणखीनच चिंतेत आहे. ही कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे प्रशासनाच्या वारंवार बैठका सुरू आहेत.

रोजचे आकडे वाढतच आहेत. चोवीस तासांमध्ये सातारा जिल्ह्यात १५४ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साताऱ्यातील शनिवार पेठेतील ४२ वर्षीय पुरुष आणि कऱ्हाड तालुक्यातील कर्वे नाका येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Web Title: Two more victims of corona in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.