जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:05+5:302021-06-03T04:28:05+5:30

सातारा : जिल्ह्यात बुधवारी म्युकरमायकोसिसचे आणखी दोन बळी गेले. त्यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या आता १० झाली आहे. ...

Two more victims of mucomycosis in the district | जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आणखी दोन बळी

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आणखी दोन बळी

Next

सातारा : जिल्ह्यात बुधवारी म्युकरमायकोसिसचे आणखी दोन बळी गेले. त्यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या आता १० झाली आहे.

जिल्ह्यात कोविडपश्चात उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये तसेच मधुमेही रुग्णांमध्ये हा आजार तत्काळ बळावत आहे. म्युकरमायकोसिसच्या काही रुग्णांवर पुणे येथे उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७९ रुग्ण आढळले असून, त्यातील १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर १० जण म्युकरमायकोसिसवर मात करुन घरी सुखरूप परतले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून, त्यामध्ये १७ बेड कार्यान्वित आहेत. मात्र, रुग्ण वाढू लागल्याने ते कमी पडत असल्यामुळे अजून बेड तयार करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून सुरु आहे.

Web Title: Two more victims of mucomycosis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.