मारहाण प्रकरणी फलटणच्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:09+5:302021-03-17T04:40:09+5:30

साताराः जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सातारा तालुक्यातील कोडोली येथील एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील विडणी येथील दोघांवर गुन्हा ...

Two Phaltan offenders in assault case | मारहाण प्रकरणी फलटणच्या दोघांवर गुन्हा

मारहाण प्रकरणी फलटणच्या दोघांवर गुन्हा

Next

साताराः जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सातारा तालुक्यातील कोडोली येथील एकास मारहाण केल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील विडणी येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सातारा तालुक्यातील उपळी येथील एका आश्रमशाळेसमोर घडली आहे.

याबाबत अस्लम शमशुद्दीन जमादार (वय ५४, रा. निशिगंधा कॉलनी, समर्थनगर, कोडोली, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हणमंत निवृत्ती सोनवलकर आणि प्रशांत हणमंत सोनवलकर (रा. विडणी, ता. फलटण) या दोघांनी आपसात संगनमत करत जुन्या भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी अस्लम यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हणमंत आणि प्रशांत या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांनी भेट दिली. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे करत आहेत.

Web Title: Two Phaltan offenders in assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.