जिल्ह्यामधील दोन तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:31 AM2021-01-14T04:31:53+5:302021-01-14T04:31:53+5:30
सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी सध्या बाधितांचे प्रमाण खूपच कमी झाले ...
सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी सध्या बाधितांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. जावळी आणि महाबळेश्वर या दोन तालुक्यांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली. मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत होती. पण, जुलै महिन्यानंतर कोरोनाचे रुग्ण दिवसाला शेकडोच्या पटीत आढळून येऊ लागले. दिवसाला ५००, ७०० ते ९०० पर्यंत रुग्ण स्पष्ट होत होते, एकवेळा तर एक हजाराच्याही वर आकडा गेला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत अशी स्थिती होती. मात्र, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तर हे प्रमाण खूपच कमी झाले. सद्य:स्थितीत १००च्या आताच रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे.
सर्वात कमी रुग्ण महाबळेश्वर तालुक्यात
जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण महाबळेश्वर तालुक्यात १२५७ आणि पाटणमध्ये २१८८ आढळले, तर कोरोनाने महाबळेश्वरात २४, तर जावळी तालुक्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी सध्या जावळी व महाबळेश्वर तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे.
तालुकानिहाय रुग्ण
तालुक्यात एकूण बाधित
सातारा १३,४०७
कऱ्हाड १०,९५१
फलटण ५,५९१
कोरेगाव ४५६२
खटाव ४०३३
वाई ४०२८
खंडाळा ३१३४
माण २६२३