corona virus -खटावमधील दोन शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 03:09 PM2021-02-25T15:09:46+5:302021-02-25T15:11:34+5:30
corona virus Sataranews- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील दोन शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे.
खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील दोन शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे.
पुसेगावमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खटावमधील पालक वर्गात भीतीचे सावट असतानाच खटावमधील शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना पालक घाबरत होते. त्यातच विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकच कोरोनाबाधित सापडल्यामुळे पालक चिंतेत आहेत. तर संबंधित शिक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या शिक्षकाची चिंता आणखी वाढली आहे.
पालकातूनही कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता मुलांना शाळेत पाठवताना विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. संबंधित विद्यालय व्यवस्थापन समिती व संस्थेच्यावतीने सोमवारपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शाळेच्या खोल्या निर्जतीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.