माणमधील दोन शिक्षकांचा एकाच दिवशी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:49 PM2020-11-20T18:49:11+5:302020-11-20T18:50:10+5:30
Education Sector, teacher, death, sataranews माण तालुक्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे श्रीमंत जगदाळे (बिदाल) व शांताराम पानसांडे (दहिवडी) या दोन प्राथमिक शिक्षकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दहिवडी : माण तालुक्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे श्रीमंत जगदाळे (बिदाल) व शांताराम पानसांडे (दहिवडी) या दोन प्राथमिक शिक्षकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
बिदाल (ता. माण) येथील श्रीमंत जगदाळे (वय ५२) यांचे बुधवारी सकाळी न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले. ते सध्या दहिवडीनजीकच्या कोकरेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षण अभियान अंतर्गत गटसमन्वयक म्हणून कामकाज पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.
दहिवडी येथील शांताराम पानसांडे (वय ४०) यांचेही बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज याठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी इंदापूर व माण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माण तालुक्याच्या शिक्षण विभागात नावलौकिक मिळविलेल्या दोन शिक्षकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकातून हळहळ व्यक्त होत आहे.