जिल्ह्यात दोन हजार उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: October 30, 2016 12:33 AM2016-10-30T00:33:46+5:302016-10-30T00:33:46+5:30
शेवटच्या दिवशी झुंबड : नगरपालिकांसाठी १२६०, तर नगरपंचायतींसाठी ७४६ अर्ज
सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये एकूण १८२ जागांसाठी १२६०, तर सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांसाठी ७४६ एवढे अर्ज शेवटच्या दिवसांपर्यंत दाखल झाले आहेत. सातारा पालिकेसाठी २५३ अर्ज दाखल झाले असून, याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. कऱ्हाड पालिकेसाठी २४१ अर्ज दाखल झाले आहेत, तर फलटण पालिकेतही तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. शनिवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. म्हसवड पालिका निवडणुकीत रंगत येणार असून, नगरसेवकांच्या १७ जागांसाठी १११, तर नगराध्यक्षपदासाठी विक्रमी असे २४ अर्ज दाखल झाले आहेत. रहिमतपूरला १७ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्वरात १७ जागांसाठी ९२ उमेदवारांचे १२० अर्ज दाखल झाले आहेत. वाईमध्ये २० जागांसाठी १२४ अर्ज दाखल आहेत.
जिल्ह्यात कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, पाटण आणि मेढा नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. या निवडणुकीत मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. कोरेगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेही रिंगणात उतरली आहे. दहिवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना-भाजप निवडणूक लढवित आहेत. दहिवडीत १७ जागांसाठी ११५ अर्ज दाखल झाले आहेत. वडूजला १७ जागांसाठी तब्बल २०८ अर्ज दाखल आहेत. पाटणला १७ जागांसाठी १४९ अर्ज तर मेढ्यात १७ जागांसाठी ६८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
दाखल झालेले
उमेदवारी अर्ज असे
पालिका जागाअर्ज
सातारा ४०२५३
कऱ्हाड २९२४१
फलटण२५२०१
वाई२०१२४
रहिमतपूर१७५९
महाबळेश्वर१७१२०
पाचगणी १७१५१
म्हसवड १७१११
नगराध्यक्षपदासाठी १०३ अर्ज
थेट नगराध्यक्ष निवडणूक होत असल्याने नगराध्यक्षपदासाठीही जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी १०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे, ते असे...
नगर पंचायतजागाअर्ज
कोरेगाव१७१०२
खंडाळा१७१०४
वडूज१७२०८
दहिवडी१७११५
मेढा१७६८
पाटण१७१४९
उदयनराजे उवाच
पालिकेत ४०-० केलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन.
मी आडमुठेपणा केला असता तर मी २२ महिने जेलमध्ये नसतो. मला त्यावेळी कोणी जेलमध्ये घातलं, हे सगळ्यांना माहीत आहे.
त्यांच्या सगळ्या मतांची बेरीज पण माझ्याएवढी
होणार नाही.
माझे काका शिवाजीराजे त्यांच्यासोबत आहेत. त्यांना डावलून मी फॉर्म भरायला आलो नसतो; पण तत्त्वं महत्त्वाची.
शिवेंद्रसिंहराजे उवाच
जिल्हा बँक निवडणूक झाली तेव्हापासूनच उदयनराजेंच्या डोक्यात मनोमिलन तोडायचं होतं.
मराठ्यांचे हे मूळ घर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दुभंगलंय, याची खंत माझ्या मनामध्ये कायम राहील.
आमदार म्हणून तुम्ही काय केलं, असं त्यांनी विचारणं चुकीचं आहे, असं मला वाटतं.
आम्ही खासदारकीला प्रचार केलेला चालतो. जिल्हा बँकेला आम्ही तुम्हाला मदत केलेली चालते. बाकी मात्र तुम्हाला आमचं काहीच चालत नाही, याला काय अर्थ ?