साताऱ्यात सराईत दुचाकी चोरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:22 AM2019-08-20T11:22:26+5:302019-08-20T11:23:52+5:30
सातारा शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
सातारा : शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
धनंजय राजेंद्र पंडित (रा. शनिवार पेठ, सातारा), राजेश गणेश वंजारी (वय ४५, रा. गुरुवार पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोघेजण चोरीच्या दुचाकी घेऊन कमानी हौदाजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा लावल्या. त्यावेळी पंडित आणि वंजारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या दुचाकी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली. या दोघांकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पुढील तपासाच्या अनुषंगाने या दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, संजय जाधव यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.