पे अॅण्ड पार्कमधून दुचाकीची चोरी, माहुली रेल्वे स्थानकातील घटना : काळजीवाहकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 03:41 PM2019-10-01T15:41:01+5:302019-10-01T15:42:16+5:30
माहुली रेल्वेस्थानकातील पे अॅण्ड पार्कमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काळजीवाहकावर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : माहुली रेल्वेस्थानकातील पे अॅण्ड पार्कमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काळजीवाहकावर गुन्हा दाखल केला आहे.
रामजी श्रीरंग पवार (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या काळजीवाहकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हणमंत लक्ष्मण निकम (वय ५४, रा. वाढे, ता. सातारा) यांनी दि. १८ ते १९ सप्टेंबर दरम्यान माहुली रेल्वे स्टेशन येथील पे अॅण्ड पार्कमध्ये दुचाकी उभी केली होती. त्यावेळी काळजीवाहक म्हणून तेथे रामजी पवार हा काम पाहत होता.
निकम हे गावावरून पुन्हा शुक्रवारी आले असता त्यांना दुचाकी नसल्याचे दिसून आले. त्यांनी रितसर पावती घेतली होती. असे असताना दुचाकी चोरीस गेली कशी, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सहायक फौजदार विष्णू खुडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
मटका अड्ड्यावर छापा; एकजण ताब्यात
रामनगर, ता. सातारा येथे एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ हजार ५७ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
शुभम उध्व इंदलकर (वय २४, रा. कळंबे, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रामनगर येथील एका गाळ्यामध्ये शुभम इंदलकर हा लोकांकडून आकड्यावर पैसे घेऊन मटका चालवत होता.
याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे शुक्रवारी दुपारी छापा टाकला. शुभमला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मटक्याचे साहित्य आणि रोकड पोलिसांनी जप्त केली. हवालदार सुजीत पांडुरंग भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.