वाईत कॅनॉलमध्ये बुडून दोन कामगारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:46+5:302021-06-10T04:26:46+5:30
वाई : वाई एमआयडीसीमधील दोन बेपत्ता कामगारांचे मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळून आले असून, या घटनेची नोंद वाई ...
वाई : वाई एमआयडीसीमधील दोन बेपत्ता कामगारांचे मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळून आले असून, या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. नरेश धर्मदासजी (वय २०, रा. ३२ ऐ इंदिरा झील सुल्तानपुरी नॉर्थ वेस्ट दिल्ली) आणि त्याचा मित्र बिरू श्रीपाल अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. ते दोघेही दि. ६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरून कंपनीच्या बाहेर निघून गेले होते.
सोमवारी संध्याकाळी ते पुन्हा कंपनीत परत न आल्याचे कंपनीचे मॅनेजर रणजित बबन मंडले यांनी कर्मचाऱ्यांसोबत बेपत्ता कामगारांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. मात्र, हे दोघेही कामगार धोम कालव्यात बुडाल्याचे स्पष्ट झाले. नरेश धर्मदासजी याचा मृतदेह रविवार पेठेलगत कालव्यात, तर बिरू श्रीपाल याचा मृतदेह भिरडाचीवाडी येथे आढळला. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार आर. झेड. कोळी करीत आहेत.