पोहताना बंधाऱ्यात बुडून दोघा युवकांचा मृत्यू, सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद

By नितीन काळेल | Published: August 16, 2023 03:33 PM2023-08-16T15:33:09+5:302023-08-16T15:46:56+5:30

सातारा : सातारा शहराजवळील दरे खुर्द गावच्या हद्दीत बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघां युवकांचा मृत्यू झाला. संबंधित मित्रांसह पोहायला गेले ...

Two youths died after drowning in dam while swimming in Satara | पोहताना बंधाऱ्यात बुडून दोघा युवकांचा मृत्यू, सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद

पोहताना बंधाऱ्यात बुडून दोघा युवकांचा मृत्यू, सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद

googlenewsNext

सातारा : सातारा शहराजवळील दरे खुर्द गावच्या हद्दीत बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघां युवकांचा मृत्यू झाला. संबंधित मित्रांसह पोहायला गेले होते. हा प्रकार स्वातंत्र्यदिनी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील रामचंद्र मोरे (मूळ रा. कडवे, ता. पाटण. सध्या रा. जानकर काॅलनी दरे खुर्द) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. तर स्वप्नील सुनील मोरे (वय १५, रा. दरे खुर्द) आणि अमोल शंकर जांगळे १६, रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ सातारा) अशी मृत युवकांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दि. १५ आॅगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या नंतर हा प्रकार घडून आला. दरे खुर्द गावच्या हद्दीत जानकर काॅलनी येथे बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी होते. या बंधाऱ्यातील पाण्यात काही मित्र पोहायला गेले होते. त्यावेळी स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे हेही बंधाऱ्यातील पाण्यात उतरले. पोहताना पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

सातारा तालुका पोलिस ठाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत नोंद झाली आहे. हा प्रकार कसा घडला याबाबत माहिती घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण हे अधिक माहिती घेत आहेत.

Web Title: Two youths died after drowning in dam while swimming in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.