ब्रिटिशकालीन वटवृक्षांना केमिकल डोस वाईतील अघोरी प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:42 PM2018-04-28T23:42:01+5:302018-04-28T23:42:01+5:30
वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग
पांडुरंग भिलारे।
वाई : वाई-पाचवड मार्गावरील वाकेश्वरजवळ रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेले ब्रिटिशकालीन वटवृक्ष वाटसरूंना आजही हक्काची सावली देत आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून या वटवृक्षांच्या बुंध्यात केमिकल ओतून आग लावली जात आहे. या आगीत हिरवेगार वृक्ष होरपळत असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
वाई-पाचवड रस्त्यावर एका भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या बुंध्यात विघ्नसंतोषींकडून आग लावण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वाई पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण आणले. सध्या वाई-पाचवड मार्गावर असलेल्या वटवृक्षांना आग लावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे जुन्या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले
आहे.
विघ्नसंतोषींकडून हे वटवृक्ष पाडण्यासाठी झाडाच्या बुंध्यात केमिकल ओतले जात आहे. यानंतर झाडाला आग लावली जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक घटना वाई-पाचवड मार्गावर घडल्या असून, आगीत हिरवेगार वृक्ष जळून खाक झाले आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
तर समाजाला नवी दिशा
वन विभागाचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याची आवश्यकता आहे.
तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसेल, असे मत नागरिकांमधून होत आहे.