उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का, लोकसभेची निवडणूक विधानसभेसोबत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:29 PM2019-09-21T13:29:03+5:302019-09-21T14:20:26+5:30
विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही.
सातारा: विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा दणका बसला आहे. कारण लोकसभेची निवडणूक विधानसभेचे सोबत होणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. दिवाळीपूर्वी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे आता जाहीर होणार आहे परंतु लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार नाही तर त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी काही अटी शर्ती टाकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे याआधी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या अटी व शर्ती मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे पोट निवडणूक ही विधानसभा निवडणूक की सोबतच व्हावी अशी अटही त्यांनी घातली होती.
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महा जनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर करताना लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे उदयनराजे यांना भीती होती ती कायम राहिली आहे विधानसभेच्या निवडणूकीनंतर लोकसभेची पोटनिवडणूक होईल तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे.