उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:28 PM2022-05-30T12:28:28+5:302022-05-30T12:51:44+5:30

राजेंनी दिलदारपणाने या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सर्वच व्हायरल होत आहे.

Udayan Raje Bhosale bought all the books from a girl on the street | उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

उदयनराजेंनी मनं जिंकली; 'त्या' चिमुकलीकडून सगळीच पुस्तके खरेदी केली! video

Next

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलमुळे बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कॉलर उडवणे, बाईकची सुसाट रपेट तर पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर कॉलर उडवत फ्लाईंग किस करताना त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. मात्र आता उदयनराजे चर्चेत आले ते एका वेगळ्याच प्रसंगामुळे. याप्रसंगामुळे उदयनराजेंनी सर्वांचीच मने जिंकली.

त्याच झाल अस उदयनराजे आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर एक चिमुकली पुस्तके विकत उभी होती. या चिमुकलीने उदयनराजेंच्या गाडीजवळ येत पुस्तके खरेदी करण्याची विनंती केली. यावेळी राजेंनी दिलदारपणाने या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सर्वच व्हायरल होत आहे.

अलिकडे ट्रफिक सिग्नलला अशी अनेक लहान मुले आपल्या पोटापाण्यासाठी अश्या कोणत्या ना कोणत्या गोष्टी विकत असल्याचे चित्र आहे. अशीच घटना उदयनराजेंच्या नजरेस पडली अन् त्यांनी या चिमुकलीकडील सर्वच पुस्तके विकत घेतली. अशी ही चिमुकले रस्त्यावर काहींना काही विकून आपल्या पोटाची भूक भागवत असल्याचे दिसून येते.


Web Title: Udayan Raje Bhosale bought all the books from a girl on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.