कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:05 PM2022-03-04T19:05:53+5:302022-03-04T19:06:18+5:30

सातारा : ‘कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला लढा हा ...

Udayan Raje support for setting up a bench of Mumbai High Court at Kolhapur | कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे

कोल्हापूर खंडपीठाच्या लढ्याला पाठिंबा : उदयनराजे

googlenewsNext

सातारा : ‘कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. या लढ्याला आमचा जाहीर पाठिंबा आहेच; परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही आमच्याकडून केले जाईल,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

मुंबई उच्य न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, सचिव अॅड. विजयकुमार तोटे-देशमुख व पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, ‘सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंंधूदुर्ग, रत्नागिरी हे सहा जिल्हे भौगोलिकदृष्ट्या संलग्न आहेत आणि कोल्हापूर हे साधारण या सहा जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. कोल्हापुरात मुंबई उच्य न्यायालयाचे खंडपीठ झाल्यास वकिलांना आणि पक्षकारांना अत्यंत सोयीचे होणार आहे. पक्षकारांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सध्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पणजी या चारच ठिकाणी उच्य न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात. गेल्या २० वर्षांपासून ही उच्च न्यायालयाची व्यवस्था आहे.’

‘सध्याची लोकसंख्या, वाढते खटल्याचे प्रमाण आणि जलद न्याय यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास ते सर्वांनाच सोयीचे होणार आहे. आजच्या घडीला न्याय मागण्यासाठी सुध्दा एक प्रकारे अन्याय होत असल्याची भावना सर्वसाधारण पक्षकारांना वाटते. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास वकील, पक्षकार यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. न्याय मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे आमचा सर्वार्थाने कृती समितीला पाठिंबा राहिला आहे आणि पुढेही राहणार आहे. खंडपीठाकरिता जे काही करायचे असेल ते सर्वार्थाने आम्ही करू,’ अशी ग्वाही खा. उदयनराजे यांनी दिली. यावेळी कोल्हापूर आणि सातारा वकील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Udayan Raje support for setting up a bench of Mumbai High Court at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.