उदयनराजेंनी कोरेगाव-भीमापेक्षा साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे ओव्हाळ यांची टीका ; भिडे- एकबोटे यांना अटक करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:02 AM2018-01-10T00:02:24+5:302018-01-10T00:03:28+5:30
सातारा : ‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत बोलण्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे,
सातारा : ‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत बोलण्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताºयाच्या प्रश्नांवर बोलावे,’ अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केली.
ओव्हाळ म्हणाले, ‘कोरेगाव-भीमामध्ये घडलेली घटना नियोजनबद्ध घडवून आणली असून, याप्रकरणी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करावी. अशा लोकांची पाठराखण करणाºया खासदार उदयनराजे यांना त्या दोघांनी सांगितलेला इतिहास मान्य आहे का, हे स्पष्ट करावे. ’
छत्रपती घराण्याचे वंशज म्हणून मान, सन्मान मिळत आहे. छत्रपती या शब्दामध्ये सर्वधर्म समभाव असा व्यापक अर्थ दडला आहे. त्यामुळे हा वारसा सांगताना खासदार उदयनराजे भोसले यांनी खरा इतिहास समजून घ्यावा. त्यानंतर जो इतिहास मान्य होईल, त्याबाबत वक्तव्य करावे. कोरेगाव-भीमाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जाणीवपूर्वक गालबोट लावणारे वक्तव्य करण्यापेक्षा खासदार उदयनराजे यांनी साताºयातील मेडिकल कॉलेज, उद्योगधंद्याचे स्थलांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे रखडलेले काम यावर बोलाव, असेही दादासाहेब ओव्हाळ म्हणाले. यावेळी बाबा ओव्हाळ, अजित नलावडे, किरण बगाडे, राजू सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंनी रयतेच्या बाजूने उभे रहावे : पार्थ पोळके
‘एकबोटे अन् भिडे हे अत्यंत सज्जन आहेत, या भाषेत खासदार उदयनराजेंनी त्यांचा गुणगौरव केला आहे. यापुढे छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या कोल्हापूरकर अन् सातारकर यांच्यापैकी नेमके कुणाचे जनतेने ऐकायचे, हे तरी उदयनराजेंनी स्पष्टपणे सांगावे. आम्ही कार्यकर्ते शिवशाहीच्या बाजूने अन् पेशवाईच्या विरोधात लढाई लढतोय, हेही उदयनराजेंनी समजून घ्यावे. मात्र, आमच्यासारख्या समतावादी मंडळींसोबत राहून चळवळीतील विचारांचे समर्थन करणे वेळोवेळी उदयनराजेंना जड गेले आहेच. यापूर्वीही राजेंनी अॅट्रॉसिटी विरोधात भाष्य केले होते, याचे वाईट वाटते,’ असे पत्रक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी काढले आहे.