उदयनराजेंची घोषणा हवेतच विरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:58+5:302021-05-27T04:41:58+5:30

सातारा : लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यासाठी सातारा नगरपालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी ...

Udayan Raje's announcement is rare in the air! | उदयनराजेंची घोषणा हवेतच विरली !

उदयनराजेंची घोषणा हवेतच विरली !

Next

सातारा : लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यासाठी सातारा नगरपालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी केली होती. या घोषणेला आता दीड महिना उलटला असून, उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले एक हजार रुपयाच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहेत. खा. उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार, का ही घोषणाही हवेत विरणार, असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. सद्य:स्थितीत फेरीवाल्यांचे जगणे मुश्कील झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खा. उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती. खा. उदयनराजेंच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते. गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू असून, हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे.

मात्र अद्यापही खा. उदयनराजेंनी जाहीर केलेली एक हजार रुपयाची मदत पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही. घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्यांना अजून का दिले गेले नाहीत, बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमिशन लाटायचे असल्याने सातारा पालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी. फेरीवाल्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने खा. उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे पालिकेकडून फेरीवाल्यांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

(चौकट)

अभिनव योजना जाहीर करा

खा. उदयनराजेंनी घोषणा करूनही फेरीवाल्यांना पालिकेकडून आर्थिक मदत मिळाली नाही याचे आश्चर्य आहे. लॉकडाऊन संपून हॉकर्सचा व्यवसाय सुरू होईल तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील, तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये सूट देऊ, अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी, असा उपरोधिक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे.

Web Title: Udayan Raje's announcement is rare in the air!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.