सभापती निवडीतही उदयनराजेंचे ‘धक्कातंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:04+5:302021-01-09T04:33:04+5:30

सातारा : खासदार उदयनराजे भोसले ‘धक्कातंत्र’ देण्यात माहीर असल्याची प्रचिती शुक्रवारी सातारकरांना ग्रेड सेपरेटरच्या निमित्ताने आली. या धक्कातंत्राची पुनरावृत्ती ...

Udayan Raje's 'shock system' even in the election of the Speaker | सभापती निवडीतही उदयनराजेंचे ‘धक्कातंत्र’

सभापती निवडीतही उदयनराजेंचे ‘धक्कातंत्र’

Next

सातारा : खासदार उदयनराजे भोसले ‘धक्कातंत्र’ देण्यात माहीर असल्याची प्रचिती शुक्रवारी सातारकरांना ग्रेड सेपरेटरच्या निमित्ताने आली. या धक्कातंत्राची पुनरावृत्ती सोमवारी (दि. ११) पालिका सभापती निवडीतही होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सातारा पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाल दि. ३ जानेवारी रोजी पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी दि. ११ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपासून चार वर्षांच्या कार्यकाळात आघाडीप्रमुखांनी जवळपास १५ नगरसेवकांना उपनगराध्यक्ष व सभापतिपदी काम करण्याची संधी दिली. मात्र, अद्याप काही महिला नगरसेवकांवर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात आली नाही. आजवर त्यांना केवळ चर्चेवरच समाधान मानावे लागले आहे.

सातारा शहराची नुकतीच झालेली हद्दवाढ व आगामी पालिका निवडणुकीमुळे यंदाच्या सभापती निवडीला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे गतिशील व कृतिशील नगरसेवकांना यंदा सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांच्या धक्कातंत्राने सर्वजण परिचित आहे. ‘जबाबदारी सोपविल्याशिवाय नेतृत्व घडत नाही’ असं उदयनराजे नेहमीत सांगतात. त्यामुळे यंदा जुन्या व अनुभवी नगरसेवकांना सभापतिपदाची संधी मिळणार की नव्या चेहऱ्याच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार? याचे उत्तर फक्त उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. सोमवारी होणाऱ्या या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

लोगो : सातारा

Web Title: Udayan Raje's 'shock system' even in the election of the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.