बाजार समितीवर उदयनराजेंचा निशाणा

By admin | Published: December 23, 2014 10:33 PM2014-12-23T22:33:00+5:302014-12-23T23:52:27+5:30

कायदा धाब्यावर : शिवराज पंपाजवळील जागा देण्यास कडाडून विरोध

Udayan Raza's target on the market committee | बाजार समितीवर उदयनराजेंचा निशाणा

बाजार समितीवर उदयनराजेंचा निशाणा

Next

सातारा : बाजार समितीचे कारभारी आणि त्यांच्या म्होरक्यांना शिवराज पेट्रोल पंपाशेजारील जागेचे डोहाळे लागले आहेत; परंतु सावजी पवारांनी दिलेली जागा स्वार्थासाठी वापरली गेली. त्यामुळे नवीन जागेचाही कायदा धाब्यावर बसवून, स्वार्थासाठी वापर केला जाईल, अशी वस्तुस्थिती दिसत आहे. त्यामुळे शिवराज पंपाशेजारील जागा बाजार समितीला देण्यास शेतकरी व जनतेसह आमचा विरोध राहील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
या संदर्भातील पत्रकात त्यांनी म्हटले आहे, ‘बाजार समितीच्या कारभाऱ्यांनी बक्षीसपत्राने मिळालेल्या जागेचा शेतकरी हितासाठी वापर न करता, स्वार्थासाठी केला. मनवे नामक सचिव लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. जागा कशासाठी घेतली आणि गाळ्यांमध्ये काय धंदे चालले आहेत, हे जनता बघत आहे. जागेचा हवा तसा व कायदा वाकवून वापर केला. बाजार समितीतीलङ्कगाजलेली बेदिली, भ्रष्टाचार बाहेर आला. मनवे छोटा मासा आहे. त्याच्या जोडीला अनेक ‘बिग बुल’ असल्याशिवायङ्कतो बेकायदा बाबी रेटणार नाही. काहींनी बाजार समितीच्या चौकशीचीही मागणी केली आहे.’ (प्रतिनिधी)


कारभाऱ्यांना नवीन जागेचे डोहाळे
बाजार समितीच्या जागेत शेतकरी हितासाठी बांधलेले गाळे, दारु दुकाने आणि बिअरबार-लॉजिंंगसाठी दिली आहेत. यामध्ये कोणाचे हात ओले झाले, हे चौकशीत स्पष्ट होईलच. तथापि बाजारसमितीला दिलेल्या जागेचा वापर करुन झाल्यावर, नवीन जागा पाहिजे, मोठी जागा पाहिजे अशा मागण्या ठराव पारीत करण्यात येऊन शिवराज पेट्रोल पंपाशेजारील जागा ताब्यात घेण्याचे डोहाळे बाजार समितीच्या कारभाऱ्यांना लागले आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Udayan Raza's target on the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.