उदयनराजेंचा हिशेब रामराजेंनी केला चुकता !

By admin | Published: March 30, 2015 12:04 AM2015-03-30T00:04:00+5:302015-03-30T00:11:18+5:30

विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर फलटण तालुक्यातील सभेत त्यांनी उदयनराजेंच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.

Udayanraazena's account of Ramarajan done! | उदयनराजेंचा हिशेब रामराजेंनी केला चुकता !

उदयनराजेंचा हिशेब रामराजेंनी केला चुकता !

Next

सातारा/वाठार निंबाळकर : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार व रामराजे यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांचा हिशेब रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी चुकता केला. विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर फलटण तालुक्यातील सभेत त्यांनी उदयनराजेंच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.
विडणी (ता. फलटण) येथे श्रीराम कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत रामराजे म्हणाले की, ‘छत्रपती जर छत्रपतींसारखे वागले, तरच सभापती सभापतींसारखे वागतील. छत्रपतींना खासदारकी विनासायास मिळाली. १९९६ मध्ये फलटणच्या राजघराण्यानेच यांना राजकारणात आणले, अन्यथा हे राजकारणात दिसलेच नसते. पंधरा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सातारा शहरात साधी एक गटार तरी यांनी बांधलीय का? ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमुक्त देश करण्याचा विडा उचलला, त्याप्रमाणे संबंधित नेतामुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करू.’ ‘सातारा जिल्ह्यातील विद्यमान खासदार व माजी खासदार यांच्या पाण्याचा संबंध फक्त बाटलीपुरताच येतो. ते आज पाणी चोरीची भाषा करत असून जिल्हा बँकेत शिरण्यासाठी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत पॅनेल करण्यासही तयार झाले आहेत. ज्यांनी आजपर्यंत बाटलीपुरतेच तोंड उघडले, अशा लोकप्रतिनिधींना यापुढे फलटण-खंडाळा तालुक्यातील एकही मत मिळू देणार नाही,’ असाही घणाघात यावेळी रामराजे यांनी केला.
उदयनराजे थांबले की मी बोलतो!
महिन्यापूर्वी रामराजे यांनी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ म्हणून उदयनराजेंचा उल्लेख केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी रामराजेंच्या विरोधात सातत्याने जोरदार टीका केली होती. मात्र, त्यावेळी रामराजेंनी ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका जाहीर केली होती की, ‘उदयनराजे ज्या दिवशी बोलायचे थांबतील, त्याच दिवसापासून मी उत्तर द्यायला सुरुवात करेन.’ या भूमिकेला जागत रामराजे आजपावेतो एका शब्दानेही बोलले नव्हते. मात्र, सभापतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पाऊल टाकले अन् उदयनराजेंचा हिशेब रविवारी चुकता केला.(आणखी वृत्त हॅलो ३)

Web Title: Udayanraazena's account of Ramarajan done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.