उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

By admin | Published: February 21, 2017 06:52 PM2017-02-21T18:52:31+5:302017-02-21T19:09:19+5:30

जावळी तालुक्यातील खर्शी-बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली

Udayanraje, activists of standard workers have come! | उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

उदयनराजे, मानकुमरेंचे कार्यकर्ते भिडले!

Next

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 21 : जावळी तालुक्यातील खर्शी-बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या पायलट व्हॅनची तसेच उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
खर्शी-बारामुरे येथील केंद्रावर खासदार उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गेले होते.

या ठिकाणी अगोदरच वसंतराव मानकुमरे, पत्नी आणि कार्यकर्त्यांसह हजर होते. अचानक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची पायलट व्हॅन तसेच खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांच्या कारची तोडफोड केली. यामध्ये एक पोलिस व मानकुमरे यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. या प्रकारानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तत्काळ खर्शी येथील मतदान केंद्रावर भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता

Web Title: Udayanraje, activists of standard workers have come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.