उदयनराजे, रामराजे ‘शेजारी-शेजारी!’; ‘विश्राम’गृहाने अनुभवला ‘तणाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:25 PM2018-09-09T23:25:54+5:302018-09-09T23:26:00+5:30

Udayanraje, Ramraje 'neighbor-neighbor!'; 'Relaxation' has experienced 'tension' | उदयनराजे, रामराजे ‘शेजारी-शेजारी!’; ‘विश्राम’गृहाने अनुभवला ‘तणाव’

उदयनराजे, रामराजे ‘शेजारी-शेजारी!’; ‘विश्राम’गृहाने अनुभवला ‘तणाव’

Next

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय संघर्ष अगदी टोकाला गेल्याचे सर्वश्रूत आहे. रविवारी दुपारी हे दोन्ही नेते अचानक शासकीय विश्रामगृहावर आल्याने पोलिसांची अक्षरश: भंबेरी उडाली. दोघेही समोरासमोर येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या वाढविलेला बंदोबस्त आणि व्यूहरचनेमुळे संघर्ष टळला. सुमारे दीड तास विश्रामगृहाचे वातावरण अत्यंत तणावग्रस्त बनले होते.
गेल्या काही महिन्यांपासून खासदार उदयनराजे भोसले आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकमेकांवर दोघेही वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी रामराजेंनी ‘माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.’ हे वक्तव्य गमतीचा भाग म्हणून रामराजे बोलले असल्याचे सांगितले जात असले तरी या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण मात्र
ढवळून निघाले.
ज्या-ज्यावेळी हे दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहावर एकत्र आले. त्यावेळी पोलिसांची डोकेदुखी वाढलेलीच दिसून आली. रविवारी दुपारीही असाच प्रकार घडला.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे शासकीय विश्रामगृहातील अजिंक्यतारा कक्ष क्रमांक एकमध्ये थांबले होते. त्यांच्यासोबत काही मोजकेच कार्यकर्ते होते. अधिकारी व कार्यकर्त्यांशी रामराजे चर्चा करत असतानाच विश्रामगृहावर खासदार
उदयनराजेंची एन्ट्री झाली. आता काय होईल, या विचारानेच पोलिसांची भंबेरी उडाली. या ठिकाणी अगोदरच तीन ते चार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांची कुमकही तेथे नव्हती. खासदार उदयनराजे इकडे-तिकडे पाहतच प्रतापगड कक्षामध्ये जाऊन बसले. परंतु त्यांच्या कक्षाचा दरवाजा उघडाच ठेवला गेला. त्यांच्यासमोर आठ, दहा कार्यकर्ते बसले होते.
ज्या ठिकाणी उदयनराजे बसले होते. तेथून कोणी आतमध्ये येतेय, कोणी बाहेर जात आहे, हे सगळे त्यांच्या निदर्शनास येत होते.
सभापती रामराजेंच्या कक्षामध्ये मात्र पोलिसांच्या हालचाली वाढल्या. पोलिसांच्या गोपनीय विभागाने ‘हाय अलर्ट’ जारी केल्यानंतर साध्या वेशातील आणि वर्दीवरील पोलिसांची जादा कुमक विश्रामगृहावर तत्काळ येऊन धडकली. रामराजेंच्या
कक्षामध्ये दोन पोलिसांनी प्रवेश करून आतून दरवाजा बंद करून घेतला. हे दोन्ही नेते आपापल्या कक्षातून एकाचवेळी बाहेर येऊ नयेत, यासाठी गोपनीय विभागातील पोलिसांच्या व्यूहरचना सुरू झाल्या.
काही पोलीस खासदार उदयनराजे यांच्या कक्षाबाहेर उभे राहिले तर काही पोलीस सभापती रामराजेंच्या कक्षामध्ये गेले. या
दोन्ही पथकाने मोबाईलद्वारे समन्वय ठेवणे सुरू केले. रामराजेंचे काम संपल्यानंतर ते कक्षाबाहेर आले. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांचे एक पथक रामराजेंसोबत बाहेर आले. तर दुसरे पथक उदयनराजेंच्या कक्षासमोर कडे करून उभे राहिले. रामराजे बोलत-बोलत बाहेर
आले. काही क्षण पायरीवर थांबले आणि आपल्या गाडीत बसून निघून गेले. तेव्हा कुठे पोलिसांनी
सुटकेचा नि:श्वास टाकला.
खासदार उदयनराजेही त्यानंतर दहा मिनिटांत आपल्या लवाजम्यासह निघून गेले.



डोळ्याने इशारा अन् मनाची घालमेल...
‘व्हीआयपी’ लोकांच्या दौऱ्यावेळी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात ते गोपनीय विभागातील पोलीस. या पोलिसांनीच एखादी गोपनीय माहिती दिल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांच्या व्यूहरचना ठरतात. सर्किट हाऊसवरही असेच झाले.
रामराजे आणि उदयनराजे यांची समोरासमोर भेट होऊ नये म्हणून या पोलिसांच्या हालचाली अगदी गतिमान झाल्या. मोठ्याने बोललो तर इतरांना समजेल म्हणून हे पोलीस डोळ्यांच्या इशाºयाने एकमेकांना माहिती देत होते. त्यावेळी आतून मात्र त्यांची घालमेल झालेली चेहºयावर स्पष्टपणे दिसत होती.

Web Title: Udayanraje, Ramraje 'neighbor-neighbor!'; 'Relaxation' has experienced 'tension'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.