उकिर्डे गावचा रस्ता ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे चिखलमय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:00+5:302021-06-06T04:29:00+5:30
म्हसवड : माण तालुक्यातील उकिर्डे गावातून जाणाऱ्या सातारा - लातूर रस्त्याचे काम सुरू आहे. इंदलकर वस्तीनजीक उत्खनन केलेल्या ठिकाणी ...
म्हसवड : माण तालुक्यातील उकिर्डे गावातून जाणाऱ्या सातारा - लातूर रस्त्याचे काम सुरू आहे. इंदलकर वस्तीनजीक उत्खनन केलेल्या ठिकाणी पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून, संबंधित कंपनी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या चिखलामुळे अपघातही होत असून, चिखलात चारचाकी वाहने रुतून बसत आहेत. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
उकिर्डे (ता. माण) येथे सध्या रस्त्याचे काम सुरू असून, मुख्य रस्त्यापेक्षा सुमारे १५ फूट रस्ता खोल खणून मार्ग करण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी रस्ता मोठ्या भुयाराप्रमाणे वाटत असून, इथेच पाणी साठून चिखलाचे साम्राज्य वाढले आहे. उकिर्डे गावानजीक सध्या काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र पाणी साचून राहिलं आहे. सध्या पाऊस बंद असूनही याठिकाणी पाणी साठून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच याठिकाणी येणारे पावसाचे पाणी अगदी धबधबा असल्याप्रमाणे दिसत असून, पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या पाण्यातून आणि चिखलातून वाट काढताना जिकरीचे झाले आहे. चिखलात दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा गाड्या चिखलात घसरून पडत आहेत. गाडी पडल्याने अंगावरील कपडे खराब होऊन मुका मार लागत असून, रात्रीच्या वेळी हे प्रमाण अधिक आहे. रात्री अंधारात गाडीच्या उजेडात पाणी अन् चिखल यांचा नीट अंदाज येत नसल्याने महिलांसह इतरांना गाडी चालवणे कठीण झाले आहे. इंदलकर वस्ती स्वरूपखानवाडी फाटा येथील लोकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रानातून जनावरांना चारा आणतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित कंपनी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
(कोट..)
सातारा - लातूर रस्त्याचे उकिर्डे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू असून, ते लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या इंदलकर वस्तीवर राहणाऱ्या लोकांना या पाण्याचा व चिखलमय रस्त्याचा त्रास होत आहे. संबंधित कंपनीच्या सुपरवायझरला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी तात्पुरती मलमपट्टी केली असून, पाऊस आला की परत जैसे थे परिस्थिती होणार, असे सांगितले.
- जितेंद्र कांबळे, पोलीसपाटील, उकिर्डे
०५ म्हसवड
उकिर्डे (ता. माण) येथे सुरू असलेल्या रस्ता कामाच्या ठिकाणी चिखल झाला असून, त्यात वाहने फसत आहेत. (छाया : सचिन मंगरुळे )
===Photopath===
050621\img-20210605-wa0090.jpg
===Caption===
उकिर्डे ता माण येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी झालेला चिखल व त्यातून रस्त्याच्या चिखलात फसलेले वाहन.