उंब्रज बसस्थानकाला बेटाचे स्वरूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:37 PM2017-10-03T16:37:53+5:302017-10-03T16:39:53+5:30
उंब्रज बसस्थानकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.
उंब्रज , दि. ३ : उंब्रज बसस्थानकात पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, बसस्थानकाला एक प्रकारे बेटाचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.
बसस्थानकात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रात्री झालेल्या पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले आहे. त्यामुळे एसटीमध्ये चढताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यातून वाट काढत एसटीमध्ये जात असताना विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पाण्यामध्ये भिजू नये म्हणून बूट आणि चप्पल हातात घेऊन काही युवक बसमध्ये चढत आहेत. हे खड्डे एसटी प्रशासन कधी मुजवेल? हे सांगता येत नाही. पण एका हुशार एसटी चालकाने एसटी उभी करताना खड्ड्याचा वापर शिस्तीसाठी केला. ऐरवी बसमध्ये चढताना गर्दी व चढाओड करणाºया महाविद्यालयीन युवकांना रांगेमधून एसटीमध्ये चढावे लागले.