दुचाकींनाही लागलाय छत्रीचा लळा
By admin | Published: June 26, 2017 01:59 PM2017-06-26T13:59:11+5:302017-06-26T13:59:11+5:30
खास पावसाळी छत्र्या दाखल, मागणीही वाढली
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २६ : पावसापासून बचाव व्हावा यासाठी जो-तो नाना उपाय करीत असतो. मग कोणी रेनकोट तर कोणी छत्री वापरतो पण दुचाकी वाहनांचे काय ? असा प्रश्न सर्वांनाच सतावत असतो. यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यात खास दुचाकींसाठी पावसाळी छत्र्या दाखल झाल्या असून यांना मागणीही वाढली आहे.
जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी पावसाळी रेनकोट, छत्र्या, चपला आदी वस्तुंनी बाजारपेठा बहरून गेल्या आहेत. या वस्तुंची बाजारपेठत आवक वाढली असून मागणीही वाढू लागली आहे. पावसापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण रेनकोट, छत्रीचा वापर करतो पण आपल्या दुचाकी वाहनांचे काय? हा प्रश्न अनेकांना सतावतो.
पावसाच्या पाण्यापासून दुचाकीचे संरक्षण व्हावे यासाठी बाजारपेठेत आता प्लास्टिक अच्छादन व वजनाने हलक्या असलेल्या अनोख्या छत्र्या दाखल झाल्या आहेत.
एकदा का ही छत्री दुचाकीला लावली की दुचाकी अन दुचाकीस्वार दोघांचेही पावसापासून संरक्षण होते. या अनोख्या छत्र्या नागरिकांसह प्रामुख्याने युवा वगार्चे आकर्षण बनल्या असून या छत्र्या नागरिकांच्या कुतूहलाचा विषय बनल्या आहेत.