उंब्रजचा फेटेवाला दुबईच्या शिवजयंती महोत्सवात मिरवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:15 PM2020-03-01T22:15:41+5:302020-03-01T22:16:10+5:30

अजय जाधव । उंब्रज : कला माणसाला जगायला शिकवते. त्याचपद्धतीने कला सामान्य माणसाला परदेशीही घेऊन जाते. असंच घडलंय येथील ...

Umbridge Fest celebrates at Dubai's Shiv Jayanti Festival! | उंब्रजचा फेटेवाला दुबईच्या शिवजयंती महोत्सवात मिरवला !

उंब्रज, ता. कºहाड येथील संदीप सपकाळ या युवकाला दुबईतील शिवभक्तांनी फेटा बांधण्यासाठी निमंत्रित केले. संदीपने त्याठिकाणी सुमारे तीनशे जणांना फेटे बांधले.

Next

अजय जाधव ।
उंब्रज : कला माणसाला जगायला शिकवते. त्याचपद्धतीने कला सामान्य माणसाला परदेशीही घेऊन जाते. असंच घडलंय येथील फेटे बांधणाऱ्या युवकाच्या बाबतीत. संदीप सपकाळ या युवकाला फेटे बांधण्याची कला चक्क उंब्रजवरून दुबईला घेऊन गेली आहे. निम्मित होते दुबई येथे होणाºया शिवजयंती उत्सवाचे.
कºहाड तालुक्यातील चरेगाव हे संदीप संपत सपकाळ याचे मूळगाव. घरची बेताचीच परिस्थिती. अशा परिस्थितीशी झगडत संदीप बारावी पास झाला. अर्थार्जनासाठी त्याने उंब्रजमध्ये सलून सुरू केले. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून फेटा बांधण्याची कला त्याने अवगत केली आणि या कलेत तो पारंगतही झाला. फेटे बांधण्याची कला संदीपने खूप मेहनतीने अवगत केलीच. मात्र, त्यातील विविध प्रकार अवगत करून फेटे बांधण्यात स्वत:चे वेगळेपण निर्माण केले. उत्कृष्ट फेटा बांधण्याबरोबरच फेटा वेगाने बांधण्यात तो तरबेज झाला. त्याच्या या कलेची चर्चा होऊ लागली आणि राज्याबाहेरून त्याला फेटे बांधण्यासाठी आमंत्रण येऊ लागले.
विविध ठिकाणी फेटे बांधत असताना तेथील लोकांशी त्याच्या ओळखी होऊ लागल्या. पुणे येथे एका लग्नाच्या सोहळ्यात त्याची ओळख दुबईस्थित अतुल माने यांच्याबरोबर झाली. संदीपची कला पाहून अतुल यांनी त्याला दुबईतील शिवजयंतीच्या उत्सवात येण्याचे निमंत्रण दिले. फेटे बांधण्यासाठी आपणास परदेशी बोलवले जाईल, हे स्वप्नातही कधी संदीपने पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला तो सुखद धक्काच होता. त्याने हे निमंत्रण स्वीकारले.
परदेशी जायचे तर पासपोर्ट लागतो आणि पासपोर्ट काढण्यापासून संदीपला तयारी करावी लागली. दुबईस्थित अतुल माने यांनी यासाठी सहकार्य केले आणि २८ फेब्रुवारी रोजी होणाºया दुबई येथील शिवजयंतीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी संदीपच्या विमानाने उड्डाण घेतले. आणि दुबईत त्याने शेकडो शिवभक्तांना फेटे बांधले.
दुबईतील उत्सवस्थळ बनले भगवेमय
मूळचे महाराष्ट्रातील असणारे चंद्र्रशेखर जाधव, संतोष मोरे व अतुल माने हे गेल्या तीन वर्षांपासून दुबईत शिवजयंतीच्या उत्सवाचे आयोजन करतात. २८ फेब्रुवारी रोजी या उत्सवात महाराष्ट्रासह भारतातील ४०० दुबईस्थित नागरिकांनी सहभाग घेतला. यातील ३०० जणांना संदीपने फेटे बांधले. पुरुष, महिलांसह ढोलपथक, झांजपथकातील सर्व शिवभक्तांच्या भगव्या फेट्यांमुळे दुबईतील उत्सवस्थळ भगवेमय बनले होते, असे संदीप सांगतो.
मी नऊ वर्षांपासून फेटे बांधत आहे. फेटे बांधण्याच्या विशेष कलेमुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, पंजाब या राज्यांतही मला बोलविण्यात आले होते. कोल्हापुरी फेटा, राजस्थानी फेटा, पुणेरी फेटा बांधण्यात माझा हातखंडा आहे. सरावामुळे मी एका तासात शंभर फेटे बांधतो.
- संदीप सपकाळ, उंब्रज

Web Title: Umbridge Fest celebrates at Dubai's Shiv Jayanti Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.