कोरेगावात विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन, शर्यतीदरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:10 PM2022-02-09T16:10:21+5:302022-02-09T17:01:11+5:30
वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याताल बिचुकले येथे विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी दुर्घटना ...
वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याताल बिचुकले येथे विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. शर्यती दरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
मृत बैलजोड्या विहिरीत अडकून पडल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने मृत बैल बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोरेगाव तालुक्यातील बिचुकले हद्दीत बुधवारी विनापरवाना बैलगाडी शर्यतीची सुरु होत्या. शर्यती सुरु झाल्यानंतर बैलगाड्या सुसाट सुटल्या. याचवेळी एका बैलगाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर ही बैलगाडीसह एका विहिरीत जावून पडली. यामध्ये दोन बैलाचा मृत्यू झाला.
या बाबतीत वाठार पोलीस ठाण्यात संयोजकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, अंदाजे किमान २० लाखांहून अधिक किमतीचे बैल यात मृत पावले असल्याचा अंदाज आहे.