वनसदृश क्षेत्रात अनधिकृत बांधकाम : नारायण राणे यांच्या पत्नीसह तीस मिळकतधारकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 06:51 AM2020-01-20T06:51:46+5:302020-01-20T06:52:00+5:30
इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे, प्रल्हाद राठी यांच्यासह तीस मिळकतधारकांना वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी नोटीस बजावली आहे.
महाबळेश्वर/वाई (जि.सातारा) : राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशावरून इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे, प्रल्हाद राठी यांच्यासह तीस मिळकतधारकांना वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत.
महाबळेश्वर येथील इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रामध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधकामे झाली आहेत. ती ताबडतोब हटविण्यात यावीत, तसा आदेश सातारा जिल्हाधिकारी व वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशा प्रकारच्या याचिका राष्ट्रीय हरीत लवाद नवी दिल्लीच्या न्यायालयात २०१५ करण्यात आला होत्या. त्याबाबत सुनावणी होऊन हरीत लवादाने दि. ३ डिसेंबर २०१९ रोजी आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
या नोटीसीत म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील तुम्ही केलेल्या क्षेत्रामध्ये विनापरवाना बांधकामाच्या अनुषंगाने समर्थनिय पुरावे कार्यालयास सादर करावेत, अन्यथा राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार वनसदृश्य, इको सेन्सेटिव्ह झोनमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामधारकांची नावे पुढीलप्रमाणे - नीलम नारायण राणे (क्षेत्र महाबळेश्वर), प्रहाद नारायणदास राठी , मोशा बाबूलाल पांचाळ (क्षेत्र महाबळेश्वर), खुर्शिद इस्माई अन्सारी( खिंगर, ता. महाबळेश्वर), सदानंद माधव करंदीकर (खिंगर), शिरीष मधुसूदन खेर, (खिंगर) विकुल बाबू दुधाणे, संग्रामसिंह अप्पासाहेब नलवडे (भेकवली ), मनीषा संतोष शेडगे (शिंदोळा), गीताश्री अशोक भोसले (कुंभरोशी), संतोष हरिभाऊ जाधव (कुंभरोशी), मनोहर रामचंद्र शिंदे (कुंभरोशी), शंकरलाल बच्चुभाई भानुशाली(दुधोशी), आसावरी संजीव दातार (दरे), विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परबती गोळे (भोसे), केशव धोंडिबा गोळे (भोसे), राजन भालचंद्र पाटील (मेटतळे), भोलू लेखराज खोसला (मेटतळे), आरची डॅनियन डिसुझा (मेटतळे), कुसूम प्रताप ओसवाल (मेटतळे भोसे), चंद्र्रशेखर चंद्रकांत साबणे (मेटतळे), संदीप नंदकुमार साळवी (मेटतळे) रक्षक अतुल चिंत्तामणी साळवी (मेटतळे), आरची डॅनियन डिसुझा (मेटतळे), खेमजी नानजी पटेल (मेटतळे), आरची डॅनियन पटेल(मेटतळे), पूजा गजानन पाटील, आनंदा राय कांबळे, अशी नोटीस बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत.