विनापरवना साठा केलेली वाळू ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:22+5:302021-03-31T04:40:22+5:30
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा) येथील दादासाहेब लक्ष्मण दुटाळ यांच्या नांदनी नदी काठावर असणाऱ्या मळवी नावाच्या शिवारात विनापरवाना ...
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा) येथील दादासाहेब लक्ष्मण दुटाळ यांच्या नांदनी नदी काठावर असणाऱ्या मळवी नावाच्या शिवारात विनापरवाना वाळूसाठा करण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवार, दि.३० रोजी सकाळी दहा वाजता वडगाव येथील तलाठी परदेशी यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे नऊ ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील किशोर नागमल उपस्थित होते.
वस्तीच्या शेजारीच शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या नांदणी नदीमधून हा वाळूसाठा उपसण्यात आल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले. रविवार आणि धुलिवंदनाच्या सुट्टीचा फायदा घेत, हा वाळूसाठा करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. मात्र, शिवारातील शेतकऱ्यांनी याबद्दलची माहिती महसूल प्रशासनास दिल्याने, वाळूसाठ्याचा महसूल विभागाकडून तत्काळ पंचनामा करण्यात आला आहे.
तलाठी परदेशी यांनी वाळूसाठा करणारा मालक दादासाहेब दुटाळ यांना बोलावून विचारला केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत, बांधकामासाठी वाळू विकत घेतल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे याबद्दलचा कोणताही पुरावा नसल्याने, या अवैद्य वाळूसाठ्याचा पंचनामा तलाठी यांनी पोलीस पाटील नागमल कोतवाल जालिंदर उबाळे आणि गावातील पंच यांच्यासमोर करून सदरचा अहवाल तहसीलदार कार्यालय वडूज, खटाव यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.