gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:29 PM2022-12-09T16:29:22+5:302022-12-09T16:45:39+5:30

आता गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला

Uncontested elections in 49 villages in Satara district Gram Panchayat elections | gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्यातील ३१९ पैकी ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका वाजला आहे, तर २४२ गावांमध्ये धुमशान होणार आहे. २४२ सरपंच पदांसाठी ६५५ जण रिंगणात आहेत, तर १८१२ जागांसाठी ३८९७ जण रिंगणात आहेत. ८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज माघारीनंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून, आता गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे.

सातारा तालुक्याात ३९ ग्रामपंचायतींपैकी दहा गावे बिनविरोध झाली असून, एकूण बारा सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. २६ सरपंच पदासाठी ६८, तर २०४ सदस्य पदांसाठी ४४७ जण रिंगणात आहेत. एका गावात सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

कराड तालुक्यात ४४ पैकी ७ ग्रामपंचायती पूर्ण, तर चार अंशत: बिनविरोध झाल्या. चार ठिकाणी सरपंच पदाचा एकही अर्ज आला नाही. सरपंच पदाच्या २९ जागांसाठी ९०, तर २६७ सदस्य पदाच्या जागांसाठी ५१५ जण रिंगणात आहेत.

पाटणमध्ये ८६ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६५ गावांमध्ये निवडणुका होत आहेत. बिनविरोध सरपंच २० ठिकणी निवडून आले आहेत. त्यामुळे ६५ सरपंच पदासाठी १६१ जण, तर ४२६ सदस्य पदांसाठी ८८२ जण मैदानात उतरले आहेत.

कोरेगावात ५१ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर एक अंशत: बिनविरोध झाली. ४१ गावांमध्ये सरपंच पदासाठी १०० जण, तर २८७ सदस्य पदांसाठी ६०८ जण रिंगणात आहेत.
वाईमध्ये सातपैकी एका ग्रामपंचायतीत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित सहा सरपंच पदासाठी १९ तर ६६ सदस्य पदांसाठी १३३ जण मैदानात आहेत. खंडाळा येथे दोन ग्रामपंचायती असून, सरपंच पदासाठी १३, तर सदस्य पदांच्या २६ जागांसाठी ८६ जण रिंगणात आहेत.

महाबळेश्वरमध्ये सहा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. आता तीन सरपंच पदांसाठी सहाजण, तर चार सदस्य पदासाठी आठजण रिंगणात आहेत. जावलीत १५ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ११ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी २५, तर सदस्य पदासाठी ९० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

फलटणमध्ये २४ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित २० ठिकाणी सरपंच पदासाठी ६९ जण, तर १८८ सदस्य पदासाठी ४१८ जण मैदानात उतरले आहेत.

माण तालुक्यात ३० पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर २७ गावांत सरपंच पदासाठी ७२, तर २१३ सदस्य पदांसाठी ४५८ जण रिंगणात आहेत. खटावमध्ये १५ पैकी दोन पूर्णत: तर एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली. आता १२ सरपंच पदासाठी ३२ जण, तर ८६ सदस्य पदांसाठी १७२ जण रिंगणात आहेत.

सरपंच पदाचे ६९, सदस्य पदाचे ८१२ सदस्य बिनविरोध

जिल्ह्यात इच्छुकांनी शेवटपर्यंत अर्ज मागे न घेतल्यामुळे अनेक ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध न होता अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर ८२१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये काही प्रभागांपुरती निवडणूक होणार आहे.

Web Title: Uncontested elections in 49 villages in Satara district Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.