उंडाळेचे कोरोना सेंटर वरदान ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:17+5:302021-05-20T04:42:17+5:30
कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन ...
कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षस्थानी होते. रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. जयवंत थोरात, डॉ. सुभाष पाटील उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून उंडाळे येथे कोरोना सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. प्रारंभी धन्वंतरीचे पूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले, तर कोविड वॉर्डचे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच संगीता माळी, उपसरपंच बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे शिवराज मोरे, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव, नगरसेवक अप्पा माने, इंद्रजित गुजर, पै. तानाजी चवरे, तालुका उपाध्यक्ष नितीन थोरात, उदय पाटील उपस्थित होते. डॉ. शेखर कोगनुळकर यांनी स्वागत केले. उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.