कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

By प्रमोद सुकरे | Published: November 13, 2022 12:08 PM2022-11-13T12:08:19+5:302022-11-13T12:09:54+5:30

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली.

Under the sugarcane rate struggle committee, farmers' organizations united in Karad | कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

Next

कराड : सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढण्याचे ठरले होते.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु आत्ताचे साखर सम्राट हे साखर कारखान्याचे मालक असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपला पहिला हप्ता ३०००च्या पुढे जाहीर करत आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सर्व शेतकरी यावेळी नमन करून  त्यांचे नाव घेऊन राजकारण, समाजकारण करणाऱ्या तुमच्या कर्मभूमीतील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी, असं साकडं ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते स्वतः शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांबद्दल अस्ता आहे .हे वारंवार दिसूनही आलेले आहे. आमची त्यांना विनंती आहे आपण जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीचा तिढा लवकरात लवकर सोडवावा .ऊस दर प्रश्न लवकरात लवकर बैठकीचे नियोजन करण्यात यावं असे आव्हान ऊसदर संघर्षाची वतीने सचिन नलवड़े यांनी केले आहे.

जाहिररित्या बोलावे...
शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखाने एक रकमी ३२००च्या आसपास दर देत आहेत. त्यांची रिकवरी ही आपल्या कारखान्या एवढीच आहे मग आपले कारखाने पहिला हप्ता ३००० च्या पुढे का देऊ शकत नाहीत? याचं कारण त्यांनी जाहीर रित्या सांगावे.  उपपदार्थाचा हिशोब आपण का दिला नाही हेही जाहीर रित्या सांगावे असे आव्हान ऊस दर संघर्षित समितीच्या वतीने 
विश्वास जाधव यांनी केले आहे.

Web Title: Under the sugarcane rate struggle committee, farmers' organizations united in Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.