एकीव मार्गावरील पूल पाण्याखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:32+5:302021-06-18T04:27:32+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला ...
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर एकीव मार्गावरदेखील बहुतांशी पुलांवरून पाणी गेले आहे.
कास परिसरात मागील दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने एकीव मार्गावरील काही पुलांवरून पाणी जातानाचे चित्र दिसत होते. तसेच शेत शिवार पाण्याने तुुडुंब भरून पाणी वाहतानाचे चित्र होते. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
एकीव धबधबा यंदा नेहमीपेक्षा जोरदार कोसळल्याने वाहणारे पाणी संरक्षक कठडा ओलांडून रस्त्यावरून वाहत होते. दरम्यान, पावसाचा पुन्हा एकदा रूद्र अवतार पहायला मिळत होता. काही चालक वाहत्या पाण्यातून पलीकडे वाहने नेतानाचे चित्र होते. यामुळे अपघात होऊन एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो दि.१७पेट्री एकीव फोटो...
फोटो ओळ : कास परिसरातील एकीव मार्गावरील पुलावरून पावसाचे पाणी वाहत आहे. ( छाया : सागर चव्हाण )