मलकापुरात चोवीस तास योजनेचा पाणीपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:59+5:302021-03-15T04:34:59+5:30
नळ पाणीपुरवठा योजनेतून शहराला गेली दहा वर्षे अखंडपणे व सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेमध्ये अत्याधुनिक मीटर, जलवाहिन्या, ...
नळ पाणीपुरवठा योजनेतून शहराला गेली दहा वर्षे अखंडपणे व सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेमध्ये अत्याधुनिक मीटर, जलवाहिन्या, सेटलिंग टँक, रॉ वॉटर फिल्टर, बेड आदी उपांगे असून ती अविरत कार्यरत आहेत. २३ फेब्रुवारीपासून दहा ते बारा दिवसांच्या कालावधीमध्ये योजनेतील सेटलिंग टँकमधील अंतर्गत दुरुस्तीची कामे करण्यात आली. पंपिंगद्वारे येणारे अशुद्ध पाणी सेटलिंग टँकमध्ये घेऊन पाण्यातून येणारा गाळ त्या सेटलिंग टँकच्या तळाशी साचला जातो. गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी पाती कायमस्वरूपी पाण्यामध्ये असल्यामुळे ती पाती नवीन टाकण्यात आलेली आहेत. संपूर्ण सेटलिंग टँकच्या अंतर्गत रंगकामासह आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी वॉटरप्रूफ लिक्विड व दोन लेअरचे रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या कामासाठी पाणीपुरवठा विभागप्रमुख ए. पी. मोहिते, बापूसाहेब येडगे, जे. डी. मुडे, उत्तम शिंदे, अधिकराव कदम, सागर जानुगडे, संतोष लोखंडे, आनंदा येडगे, सुरेश शिंदे, दिनकर सोरटे, प्रभाकर ढापरे, सुरेश कराळे, हणमंत चौधरी, दिनकर पाटील, शरद कदम, प्रकाश पवार व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- कोट
पाणीपुरवठा योजनेच्या देखभालीच्या कामामुळे काही कालावधीत पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होता. तो पुन्हा पूर्ववत व सुरळीतपणे चालू करण्यात आला आहे. नागरिकांनी पूर्वीप्रमाणे काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
- मनोहर शिंदे
उपनगराध्यक्ष, मलकापूर
फोटो : १४केआरडी०५
कॅप्शन : मलकापूर येथे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या सेटलिंग टँकची स्वच्छता करण्यात आली असून, काम पूर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.