जिल्ह्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:22+5:302021-07-27T04:41:22+5:30

सातारा : महापुरामुळे बाधित झालेल्या ८१ हजार ६१७ पैकी ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यंत्रणेला यश ...

Undo power supply to 64,000 customers in the district | जिल्ह्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

जिल्ह्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

Next

सातारा : महापुरामुळे बाधित झालेल्या ८१ हजार ६१७ पैकी ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यंत्रणेला यश आले आहे. बंद असलेल्या १७ हजार ५२० ग्राहकांमध्ये १० हजार ५२४ शेतीपंप ग्राहकांचा समावेश आहे.

दरम्यान, पावसाने थोडी उसंत दिली असली तरी दरडीमध्ये वाहून आलेल्या गाळामुळे कोसळलेले खांब उभे करताना वीज कर्मचाऱ्यांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. पावसाने उघडीप दिल्यास उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही युद्धपातळीवर सुरळीत करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे.

सातारा जिल्ह्यात महापुराच्या संकटाचा ७ उपकेंद्रांना फटका बसला होता. त्यातील ५ उपकेंद्र दोन दिवसांत सुरू झाली, तर बंद असलेल्या रासाटी व मरळी उपकेंद्रांवर अवलंबून असलेला भाग इतर उपकेंद्राशी जोडल्याने बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ४२२ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सोमवारी (दि. २६) दुपारपर्यंत ३६३ गावे सुरू झाली, तर ५९ गावांच्या वीजपुरवठ्याचे काम सुरू आहे. बहुतांश गावे दुर्गम भागात असून, यामध्ये छोट्या-छोट्या वस्त्यांचाही समावेश आहे. यात पाटण तालुक्यातील जवळपास २० गावे आहेत.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिकच्या ६५ हजार ग्राहकांपैकी ५९ हजार ७४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. तर शेती व इतर १५ हजार ४०५ ग्राहकांपैकी ४८५१ ग्राहकांचा अशा एकूण ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा आज रोजी सुरळीत झालेला आहे. परिणामी आपत्तीग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक

प्रलयात महावितरणची वितरण यंत्रणा काही ठिकाणी पाण्यात बुडाली. अनेक भागात तारांसह विजेचे खांब जमीनदोस्त झाले. प्रतिकूल वातावरणात डोंगर दऱ्यातून अवजड खांब, रोहित्रे व इतर अवजड साहित्य अंगा-खांद्यावर वाहून नेत महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी कौतुक केले आहे.

सोबत : वीजपुरवठा सुरळीत करतानाचे फोटो मेलवर.

Web Title: Undo power supply to 64,000 customers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.