Satara News: कासवंड वनक्षेत्रात गव्याचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 11:31 AM2023-03-18T11:31:59+5:302023-03-18T11:32:17+5:30

या घटनेने वन्य प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

Unfortunate death of gaur during childbirth in Kaswand forest area Satara | Satara News: कासवंड वनक्षेत्रात गव्याचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू

Satara News: कासवंड वनक्षेत्रात गव्याचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

दिलीप  पाडळे

पाचगणी: कासवंड, ता. महाबळेश्वर येथील वनक्षेत्रात मादी गव्याचा आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती प्रसूती दरम्यान मादी गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या घटनेने वन्य प्रेमीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कासवंड वनक्षेत्रात काल, शुक्रवारी अभिषेक पवार हे पश्चिमेकडे असलेल्या तांबुटा वनक्षेत्रात भटकंतीसाठी गेले होते. त्यांना त्याठिकाणी वन्यप्राणी मृताअवस्थेत आढळला. जवळ जाऊन पाहिले असता तो गवा असल्याची खात्री झाली. घरी आल्यानंतर त्यांनी वडील वन्यजीवप्रेमी सर्जेराव पवार याबाबत माहिती दिली. पवार यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन्यजीवप्रेमी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. वनअधिकारी व पशूवैद्यकीय अधिकारी जितेंद्र पाठक यांनी  गव्याची तपासणी केली. त्यांनी हा गवा मादी पैलारू असून प्रसूती पश्च्यात गर्भाशय फाटल्याने मरण पावल्याची शक्यता वर्तवली. सदर वनक्षेत्र दुर्गम असल्याने जवळपास वाहन साधने उपलब्ध नसल्याने त्याचं  ठिकाणी  गव्याचे दहन करण्यात आले. 

Web Title: Unfortunate death of gaur during childbirth in Kaswand forest area Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.