जावळी-तरडगावात संघ; परळी-मायणीत समिती

By admin | Published: June 17, 2015 09:52 PM2015-06-17T21:52:51+5:302015-06-18T00:38:59+5:30

शिक्षक बँक निवडणूक : शिक्षक समिती-संघाची बँकेतील सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला

Union in Jawali-Taragaga; Parli-Maniyat Committee | जावळी-तरडगावात संघ; परळी-मायणीत समिती

जावळी-तरडगावात संघ; परळी-मायणीत समिती

Next

कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेची सत्ता मिळविण्यासाठी शिक्षक संघ, समितीमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले असून, ग्रामीण भाग प्रचाराने ढवळून निघाला आहे. जिल्ह्यात गिरवी- तरडगाव, जावळी, फलटण, खंडाळा, दहिवडी यासह नऊ ते दहा मतदारसंघांत संघाची एकसंध ताकद पाहायला मिळत आहे. यामुळे येथील संघाचे उमेदवार निश्चित आहेत. तर सत्ताधारी समिती परळी, मायणी, वाई, रहिमतपूर यासह पाच ते सहा मतदारसंघांत मजबूत असलेली पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत दोन्ही शिक्षक संघ एकत्र आल्याने शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. शिक्षक संघाच्या कायम पाठीशी राहिलेल्या जावळीत संघाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशीच राहण्याचा इतिहास आहे. त्यामुळेच जावळीतून आत्तापर्यंत बँकेत संघाचे उमेदवार गेलेले आहेत. यावेळीही एकत्रिकरण झालेल्या जावळी मतदारसंघात शंकर जांभळे विरोधी समितीचे संपत शेलार असा सामना होत आहे. तर गिरवी-तरडगाव मतदारसंघात देखील संघाचीच ताकद आहे. पूर्वीचा गिरवी मतदारसंघ आता तरडगाव-साखरवाडी मिळून एक झालेला आहे. गिरवी हा गट अनेक वर्षांपासून संघाचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. या मतदारसंघातून शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम निवडणूक लढवित असल्यामुळे संघातील शिक्षक, कार्यकर्ते
तन-मन-धन पणाला लावून काम करीत असलेले पाहायला मिळत आहेत.
तर कदम यांना अपक्ष उमेदवार संतोष निंबाळकर यांनी माघार घेऊन साथ दिल्यामुळे शिक्षक समितीचे उमेदवार संजय बोबडे हे बॅकफूटवर गेले आहेत. या मतदारसंघासह जिल्ह्यात संघातील मनोमिलनामुळे फलटण-बरड, दहिवडी, खंडाळा, महाबळेश्वर, कराड- पाटण सह नऊ ते दहा मतदारसंघांत संघाची चांगलीच ताकद वाढलेली पाहायला मिळत आहे.
शिक्षक समितीचा परळी मतदारसंघ हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी समितीचे अनिल चव्हाण विरोधी शिक्षक संघाचे राजकुमार जाधव असा सामना होताना पाहायला मिळत आहे. तर मायणीत समितीचे चंद्रकांत मोरे विरोधी शिक्षक संघाचे नवनाथ खरमाटे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघटनांनी बँकेतील सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
तर दोन्ही संघ सत्ता आमचीच येणार, असा दावा करीत आहेत. त्यामुळे ज्या संघटनेच्या पॅनेलच्या सर्वसाधारण गटातील अधिक जागा येतील त्या संघटनेच्या पॅनेलमधीलच राखीव गटातील पाच उमेदवार विजयी होतील,हे निश्चित. त्या दृष्टीने शिक्षक सभासदांनी पॅनेल टू पॅनेल,
असे काम सुरू ठेवलेले दिसत आहे. (प्रतिनिधी)



राज्य कोषाध्यक्षांचे कडवे आव्हान...
पाटीलप्रणित संघ व थोरातप्रणित संघाला एकत्र आणण्याचे काम पाटील गटाचे राज्य कोषाध्यक्ष तुकाराम कदम यांनी पाटील गटाकडून मोठी भूमिका बजावली. ते स्वत: तरडगाव गटातून निवडणूक लढवित आहेत. येथे शिक्षक समितीचे काही नेते नाराज आहेत. तर कदम हे गिरवीचे रहिवासी व तरडगाव परिसरात नोकरी करीत असल्यामुळे त्यांचा दोन्ही विभागांमध्ये जनसंपर्क पाहता त्यांची ‘कदम-कदम बढाए जा,’ अशी स्थिती असून, त्यांनी समितीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

Web Title: Union in Jawali-Taragaga; Parli-Maniyat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.