सेवानिवृत्त जवानांच्या देशसेवेला अनोखी मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:12+5:302021-08-22T04:41:12+5:30
कुडाळ : देशप्रेमाने प्रेरित होऊन देशाची सेवा बजावताना अनेक ठिकाणी शत्रूशी दोन हात करत मातृभूमीची सेवा अजित ...
कुडाळ : देशप्रेमाने प्रेरित होऊन देशाची सेवा बजावताना अनेक ठिकाणी शत्रूशी दोन हात करत मातृभूमीची सेवा अजित तावरे यांनी चोख बजावली. सीमा सुरक्षा दलातील २४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बीएसएफ मेजर या पदावरून निवृत्त होऊन तावरे हे रायगाव (ता. जावळी) या आपल्या गावी आले. गावातील ग्रामस्थ व महिलांनी त्यांची बैलगाडीमधून ढोल, ताशा, हलगीच्या गजरात मिरवणूक काढली. त्यांच्या या देशसेवेला गावकऱ्यांनी अनोखी मानवंदना दिली.
या मिरवणुकीवेळी जयहिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने व त्यांच्या पत्नी वैशाली माने, जावळी तालुका उपाध्यक्ष अनिता गायकवाड, संचालिका उर्मिला कदम, सातारा जिल्हा सचिव उमेश मोरे, प्रशांत गुजर, धनंजय गोरे, अनुकूल चिकाटे, सुहास भोसले, अमर कदम, अमोल काकडे, शिवाजी गायकवाड, नामदेव क्षीरसागर, राजेंद्र अंबुले, उपसरपंच समाधान गायकवाड, शंकर कदम उपस्थित होते.
चौकट:
जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने जवानांचा सन्मान
जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने जवान अजित तावरे यांचा संविधान फ्रेम, आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने गावातील बाळू तोडरमल, दिलीप शिंदे, सागर तावरे, महेश पवार, ज्ञानेश्वर क्षीरसागर या निवृत्त माजी सैनिकांनाही सन्मानित करण्यात आले.
२१ कुडाळ सैनिक
रायगाव (ता. जावळी) येथे सेवानिवृत्त जवान अजित तावरे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढत ग्रामस्थांनी स्वागत केले.