हिंदी भाषेमुळे देशाची एकता टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:53+5:302021-09-25T04:42:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ''शेकडो वर्षांपासून हिंदीच्या माध्यमातून देशाची एकता टिकून आहे. संपूर्ण जगात हिंदी हीच अव्वल भाषा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ''शेकडो वर्षांपासून हिंदीच्या माध्यमातून देशाची एकता टिकून आहे. संपूर्ण जगात हिंदी हीच अव्वल भाषा ठरली असून तिचे शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते आहेत,'' असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी यांनी काढले.
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताह सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. सुवर्णा कांबळे, आजाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. शोभा पाटील, शहानवाज मुजावर, आय. वाय. मुल्ला, शिवाजी खामकर, सुधाकर माने, अनंत यादव, सुनंदा शिवदास, नारायण शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. सुवर्णा कांबळे, प्रा. शोभा पाटील, सुधाकर माने, ह. रा. सूर्यवंशी, जुबेर बोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी हिंदी प्रचार व प्रसारासाठी योगदान देणाऱ्या नेताजी ननावरे, फैयाज संदे, दिनकर माथणे, ज्ञानेश्वर देशमुख, अस्लम शेख, वसंत शिंदे, विजयकुमार पिसाळ, प्रवीण भांडवलकर, महाळप्पा शिंदे, विनायक बगाडे यांच्यासह महिला अध्यापिका छाया कदम, शीतल मोरे, सुषमा माने, आकांक्षा भोंगळे, मीनाक्षी बडीगार, सुनीता सकटे, रोहिणी बगाडे आदींसह गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्तविक रवींद्र बागडी यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार पिसाळ यांनी केले. प्रवीण भांडवलकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेचे व्यवस्थापक नवनाथ शिंदे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
फोटो : मेल
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या सप्ताह सांगता समारंभात ता. का. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.