कोपर्डेच्या ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:35+5:302021-06-03T04:27:35+5:30

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. वैभव चव्हाण यांनी विलगीकरण कक्षामध्ये घ्यावयाची काळजी ...

The unity of the villagers of Coparde is admirable | कोपर्डेच्या ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद

कोपर्डेच्या ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद

Next

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. वैभव चव्हाण यांनी विलगीकरण कक्षामध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडलाधिकारी विनायक पाटील, डॉ. वैभव चव्हाण, डॉ. अमित जाधव, सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, तलाठी संजय सावंत, आरोग्य सेवक संदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने गावोगावी संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारण्यास सुरुवात झाली आहे. कोपर्डे हवेली गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक लोकांना स्वतंत्र राहण्याची सोय नसल्याने होम आयसोलेट व्हावे लागत होते; पण त्यामुळे इतरांना संसर्ग होत होता. गावातील ही परिस्थिती ओळखून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी प्रास्ताविक केले.

फोटो : ०२केआरडी०१

कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अमरदीप वाकडे, विनायक पाटील, नेताजी चव्हाण, शुभांगी चव्हाण आदी.

Web Title: The unity of the villagers of Coparde is admirable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.