कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:20+5:302021-02-05T09:06:20+5:30
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवड बुधवारी दुपारी बिनविरोध झाली. अध्यासी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी ...
कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवड बुधवारी दुपारी बिनविरोध झाली. अध्यासी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी काम पाहिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे यांच्या आघाडीच्या सदस्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांंची मुदत संपल्याने नव्याने निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला होता. त्यानुसार
ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. त्यामध्ये सभापतिपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. स्थायी समितीचे सभापतिपद हे पदसिद्ध असल्याने नगराध्यक्षा रेश्मा कोकरे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पाणीपुरवठा स्वच्छता व जलनि:स्सारण समितीच्या सभापतिपदी उपनगराध्यक्षा मंदा बर्गे, नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी संजय पिसाळ, बांधकाम समितीच्या सभापतिपदी अर्चना बर्गे व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी पूनम मेरुकर यांची निवड करण्यात आली. नगरसेवक संजय पिसाळ, नितीन ओसवाल यांच्यासह नगरसेवकांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीसाठी ज्योती पाटील यांना मुख्याधिकारी विजया घाडगे, अव्वल कारकून सारंग जाधव, मंडल अधिकारी किशोर धुमाळ, तलाठी शंकरराव काटकर, नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक बाळासाहेब सावंत यांनी साहाय्य केले.
(कोट)
कोरेगावचा सर्वांगीण विकास करणार
आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नगरसेवक आघाडी धर्माचे पालन करत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच जण कटिबद्ध आहेत.
- मंदा बर्गे, उपनगराध्यक्षा
२७ कोरेगाव
: कोरेगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडीप्रसंगी ज्योती पाटील, रेश्मा कोकरे, मंदा बर्गे, अर्चना बर्गे, संगीता बर्गे, विजया घाडगे व नगरसेवक उपस्थित होते.