वाझोलीत एकजुटीतून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:23+5:302021-01-09T04:32:23+5:30
वाझोली येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकोपा ठेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी संदीप दिनकर ...
वाझोली येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकोपा ठेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी संदीप दिनकर मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावचा विकास म्हणजे प्रत्येक ग्रामस्थाचा विकास असे समजून गावातील राजकीय वैर संपविण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीवेळी गावामध्ये मुंबईवरून मतदानासाठी गाडी येत असताना पुणे येथे गाडीचा मोठा अपघात झाला. त्यावेळी गावातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना डोळ्यासमोर ठेवून गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व युवकांनी गावची निवडणूक बिनविरोध केली. वाझोली ग्रामपंचायत एकूण ७ सदस्यांची आहे. त्यापैकी देसाई गटाचे ५ सदस्य व पाटणकर गटाचे २ सदस्य असे एकूण ७ सदस्य बिनविरोध निवडून देण्यात वाझोली, डाकेवाडी, सलतेवाडी या तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी सहकार्य केले. अशोक पांडुरंग मोरे, रामचंद्र महादेव चव्हाण, विजया संदीप पाटील, रमेश सदाशिव लोहार, सविता आनंदा मोरे, शीतल संजय लोहार व सुशीला शिवाजी मोरे हे सात सदस्य बिनविरोध निवडून आले.
बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार शिवसेना तालुकाध्यक्ष व माजी सरपंच राजेश चव्हाण, पोलीस पाटील विजय सुतार, वसंत पाटील, प्रदीप पाटील, आनंदा मोरे, जयवंत पाटील, धनाजी मोरे, संदीप पाटील, सागर पाटील, शिवाजी मोरे, बाबूराव मोरे, महेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
फोटो : ०८केआरडी०४
कॅप्शन : वाझोली (ता. पाटण) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.