परदेशी नागरिकांचा विनापरवाना पाहुणचार

By admin | Published: January 13, 2016 10:14 PM2016-01-13T22:14:43+5:302016-01-13T22:14:43+5:30

लॉजमालकावर गुन्हा : पाचगणीतील टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांची सतर्कता

Unprivileged Hospitality of Foreign Citizens | परदेशी नागरिकांचा विनापरवाना पाहुणचार

परदेशी नागरिकांचा विनापरवाना पाहुणचार

Next

पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने परदेशी नागरिकांना विनापरवाना बगंला भाड्याने देण्याचे कारणावरून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी पर्यटक पाचगणीत आल्यावर विविध हॉटेल्स व लॉजवर वास्तव्य करतात.
पंरतु संबंधित हॉटेल व लॉजमालकांनी पर्यटकांची माहिती २४ तासांच्या आत देणे गरजेचे असते. परदेशी पाहुण्यांची आॅनलाइन नोंदणी करून संबंधित कार्यालयाकडे तसेच पाचगणी पोलीस ठाण्यात नोंदी करणे आवश्यक असते. पंरतु ‘ग्रीनपार्क लॉजिंग’चे (न्याहारी-निवास योजना) चालक रईस अहमद शेख (वय ५२, रा. बागडे रोड पाचगणी) यांनी लॉजमध्ये दोन परदेशी विद्यार्थी वास्तव्यासाठी ठेवले होते.
रशियाचे नागरिक असणारे हे दोघेजण बिनाधास्तपणे सातारा पासिंगची दुचाकी घेऊन फिरत असल्याचे टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. कार्यकर्त्यांनी ते कुठे उतरले आहेत, याची माहिती घेतली. संबंधितांना गाडीविषयी विचारले असता, ‘आम्हाला ती लॉजमालकाने भाड्याने दिली,’ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात धाव घेतली व ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दिली.
शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लॉजमालक रईस अहमद शेख याच्यावर विदेशी नागरिक कायद्याच्या (१९४६) कलम १४ अन्वये पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
सूचना देऊनही उल्लंघन
पाचगणी पोलिसांनी अशा गुन्ह्यांवर नजर ठेवली असून याबाबत सर्व शाळामालक, होस्टेल्स, लॉजमालक, हॉटेलमालकांना या कायद्याची माहिती दिली आहे. परंतु काहीजण याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. टॅक्सी युनियनच्या कार्यकर्त्यांनी ही सतर्कता दाखवली.

Web Title: Unprivileged Hospitality of Foreign Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.