बिनविरोधसाठी हालचाली सुरू

By admin | Published: September 30, 2015 10:14 PM2015-09-30T22:14:24+5:302015-10-01T00:34:13+5:30

९३ ग्रामपंचायती : कोडोली, चिंचणेर वंदन, भरतगाव, अंगापूर, पाडळी, नागठाणे, मांडवेत येणार रंगत

Unrestrained movements begin | बिनविरोधसाठी हालचाली सुरू

बिनविरोधसाठी हालचाली सुरू

Next

सातारा : जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वात जास्त ९३ ग्रामपंचायती सातारा तालुक्यातील आहेत. मागील निवडणुकीत २३ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात दोन्ही राजेंच्या स्थानिक शिलेदारांना यश आले होते. आताही जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.
पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. तालुक्यातील आंबळे, कोडोली, समर्थनगर, काळोशी, अंबवडे बु, कोंदणीनरेवाडी, सांबरवाडी, किडगाव, अंगापूर तर्फ तारगाव, कोंडवे, सारखळ, कुमठे, अतीत, कुसवडे, तासगाव, कुरुण, आवाडवाडी, कुशी, ठोसेघर, कुस खु., बनघर, लांडेवाडी, वर्णे, लिंबाचीवाडी, बसाप्पाचीवाडी, लावंघर, वासोळे, मग्दुलभटाची वाडी, भरतगाव, महागाव, वेणेगाव, निगुडमाळ, भाटमरळी, माजगाव, वाढे, नुने, बोर्णे, मांडवे, अगुंडेवाडी, पाटेश्वरनगर, चिंचणी, मापरवाडी, आकले, पिलाणीवाडी, चिंचणेर वंदन, मस्करवाडी, चाळकेवाडी, राकुसलीवाडी, चोरगेवाडी, नागठाणे, चिखली, रामकृष्णनगर, डबेवाडी, नांदगाव, दरे तर्फ परळी, रेवंडे, गणेशवाडी, नेले, देवकल पारंबे, रोहट, गोवे, निनाम, धनगरवाडी, सैदापूर, हमदाबाज, पाडळी, धनगरवाडी (निगडी), शिंदेवाडी, जांभे, पाटेघर, धनवडेवाडी, शिवथर, ज्योतिबाचीवाडी, पाटखळ, इंगळेवाडी, सोनवडी, कळंभे, पेट्री, जाधववाडी, वनगळ, करंडी, पिंपळवाडी, जरेवाडी, यादववाडी, खडगाव, पोगरवाडी, जवळवाडी, भैरवगड, खोडद या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे.
मागील निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार रस्सीखेच झाली.
अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तनही झाले. शहरासह तालुक्यात बहुतांश सत्तास्थाने ही खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाकडे आहेत. मागील निवडणुकीत ४१ ग्रामपंचायतीपैकी २३ दोघांनीही बिनविरोध करून दाखविल्या. निवडणूक झालेल्या इतर ग्रामपंचायतींमध्ये मनोमिलनाची सत्ता आली. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. (प्रतिनिधी)

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोमिलनाविरोधात मोठा प्रतिस्पर्धी अद्याप रिंगणात नाही. मात्र, दोन राजेंचेच कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या गटांवर डोळा ठेवून नेत्यांकडे ग्रामपंचायतीचं तिकीट मागायचे, अशाही व्यूव्हरचना काहीनी आखल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून नेत्यांकडे तिकिटासाठी हट्ट धरला आहे.

Web Title: Unrestrained movements begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.